शिवसेना एनडीएतून बाहेर ; भाजपकडून अधिकृत घोषणा

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडी अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची चिन्हे आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडली आहे.
केंद्रात भाजपसोबत सत्तेत असलेले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.
आता मात्र भाजपने शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तसेच केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
यावेळी जोशी म्हणाले की, शिवसेना एनडीए बैठकीला आली नाही. त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा देखील दिला आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची जागा विरोधी बाकांवर बदलण्यात आली आहे.
एनडीएमध्ये १८ खासदारांसह सत्तेत सहभागी असलेला शिवसेना हा पक्ष आता विरोधी बाकावर बसणार असल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा