मुंबई : राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचे कौल दिले असताना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आहे.त्यामुळे हा जनतेचा अपमान आहे. असे म्हणत रासपचे नेते महादेव जानकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. म्हणाले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जानकर बोलत होते.
यावेळी जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो. त्यामुळे आत्ता सुद्धा आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असून त्यासाठी विरोधात बसण्याची वेळ आली तरीही चालेल.
तसेच पुढे सत्ता आल्यास पुन्हा सत्तेत बसू, असे जानकर म्हणाले. तर याचबरोबर त्यांनी शिवसेनेवर सुद्धा टीका केली.
विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून जनते समोर गेलो होतो. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचा कौल दिला होता. मात्र शिवसेनेने जनतेचा अपमान करण्याची भूमिका घेतली, ती बरोबर नसल्याचे जानकर म्हणाले.
महायुतीत निवडणूक लढवून त्यांनी ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.