गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेनेच्या पारड्यात आणखी एका आमदाराची भर

शिवसेनेच्या पारड्यात आणखी एका आमदाराची भर

सत्तेवरून दबावाचे राजकारण सुरू असताना शिवसेनेच्या पारड्यात आणखी एका आमदाराचे वजन पडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा चे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मातोश्रीवर भेट घेत शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देतील असा अंदाज लावला जात होता परंतु गडाख यांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे.
शिवसेनेला आत्तापर्यंत पाचपेक्षा आमदारांनी समर्थन दर्शविले आहे आणि आता शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर गेले आहे

error: Content is protected !!
Exit mobile version