शिवसेनेला हवंय अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं.

या बैठकीतील काही ठळक मुद्दे

यापूर्वी आमची अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती.

त्यावेळी आम्ही 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती.

राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा झाली होती.

आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे.

उपमुख्यमंत्रीपद हे आमच्यासाठी दुय्यम आहे.

सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली

तसेच दुसऱ्या पक्षाचे काही आमदार संपर्कात असल्याचे हि समोर आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा