शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद: छगन भुजबळ

41

मुंबई: शिवसेनेला केवळ अडीच वर्षेच नाही तर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी आहे, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत केले.
तर यापूर्वीही विधिमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मुख्यमंत्री झालेली आहे, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. तसंच शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत नेमकं काय ठरतं यावर पुढची राजकीय समीकरणं अवलंबून असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.सत्तास्थापनेच्या दृष्टीनं काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरू असलेल्या हालचालींवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.