शिवसेनेने काय मागायचे याचे स्वातंत्र्य त्यांना आहे: चंद्रकांत पाटील

28

कोथरूड येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांची ंसदीय बैठक ३० ऑक्‍टोबरला मुंबईत विधानसभा भवन येथे होणार आहे. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपचा सभागृह नेता कोण असेल हे ठरेल असे पाटील म्हणाले.
शिवसेनेशी सुरू असलेल्या वाटाघाटी बद्दल बोलताना ते म्हणाले, शिवसेनेसोबत दोन ते तीन दिवसात चर्चा सुरू होईल. शिवसेनेने काय मागायचे याचे स्वतंत्र त्यांना आहे पण काय ठरते हे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस हे चर्चा करतील.अडचण आल्यास अमित शहा यांच्याशी चर्चा करतील फडणवीस यांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले