इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी देवकर उड्डाणपुलाजवळ शिवशाही बस ने (क्रमांक एम एच झिरो नऊ अठरा) येथील तीन वर्षीय चिमुरडी ला चिरडले. रिया प्रेम कुमार गौतम असे तिचे नाव आहे व ही घटना सकाळी आठ वाजता घडली.
एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या परराज्यातून आलेल्या कुटुंबीयांची रिया ही एकुलती एक मुलगी होती शिवशाही नॅचरल यानंतर स्थानिक ग्रामस्थ यांनी रास्तारोको केला होता. स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रिया उड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत असताना वेगाने आलेल्या शिवशाही बस ने तिला जोराची धडक देऊन चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी बस रोखून धरत महामार्गावरील वाहतूक अडवून धरली. ऑल कंपनीचे गस्ती वाहक फोन करूनही तात्काळ उपलब्ध झाले नाही त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी स्थानिकांची समजूत काढून महामार्ग सुरक्षित केला यावेळी पेपर रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड, बाळासाहेब धोंडे म्हणाले की लोणी देवकर ते सर्व प्रकारच्या एसटी बस थांबा मंजूर आहे. टोल कंपनीने दोन्ही बाजूला बस थांबा ची सोय केली आहे, मात्र एकही एसटी बस थांब्यावर थांबत नाही गावातून उड्डाणपुलावरून सर्व सुसाट वेगाने जातात यामुळे बस थांबे व सापडले आहेत परिणामी लोकांना उड्डाणपुलावरून सोडून जावे लागते यामुळे येथे अनेक अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.