गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा शिवशाही बस – कारच्या धडकेत सहा जण जखमी

शिवशाही बस – कारच्या धडकेत सहा जण जखमी

श्रीरामपूर : कोल्हार येथे नगर- मनमाड महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ शिवशाही बस व एरिटीका कारचा भीषण अपघात झाला.
या अपघातात ५ महिलांसह चालक जखमी झाला आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोपरगावहुन पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पुलाजवळ आली. यावेळी शनी शिंगणापूर कडून शिर्डीकडे जात असलेल्या एरिटीका कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचा अंदाज न आल्याने अपघात झाला.
या बसमध्ये आसाम मधील साईभक्त महिला होत्या. या अपघातात कारचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या कारमधील ५ महिला गंभीर जखमी असून चालकाच्या डोक्यालाही मार लागला आहे.
अपर्णा अनिल लामा (वय -२०), पार्वती चंद्र प्रकाश लामा (वय- ६४), पुनम अनिल लामा (वय -४२) ,कांची देंढु डुबका (वय -६५), नारीम उदय डुबका (वय -५०), सर्व राहणार दार्जिलिंग, निखील संजय अत्रे (वय २३)रा.राहता.
अपघातातील कार शिर्डी येथील असल्याचे समजते. सर्व जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version