गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे शोएब अख्तर म्हणतोय विराटने टी ट्वेंटी मधून निवृत्त व्हावे

शोएब अख्तर म्हणतोय विराटने टी ट्वेंटी मधून निवृत्त व्हावे

पुणे, २६ ऑक्टोबर २०२२ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली खूप टाईमानंतर पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म मध्ये आला आहे. विराटने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांत भारतीय संघ अडचणीत असताना एक शानदार खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

त्याच्या या कामगिरीचं जगभरातून कौतुक होत असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी आपल्या युट्युब व्हिडिओमध्ये दोन्ही संघाचे कौतुक केले. मात्र त्यांनी विराट कोहलीच्या बद्दल बोलताना विराटला टी ट्वेंटी मधून निवृत्त होण्याच्या सल्ला दिला आहे.

शोएब च्या मते विराटने संपूर्ण ऊर्जा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये लावू नये इतकच नाही. तर त्याने आज ज्याप्रकारे खेळी केली आहे. तितक्याच ताकदिने खेळल्यास तो एकदिवसीय सामन्यांमध्ये आणखी काही शतक करू शकेल. त्यामुळे विराट ने आता टी ट्वेंटी मधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे.

याचबरोबर शोएब ने विराट कोहलीचं पाकिस्ताविरुद्धच्या नाबाद ८२ धावांच्या खेळीचं कौतुक केलं. त्याच्या खेळीमूळचं भारताला पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवता आला असं ही शोएब म्हणाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version