गोल पोस्ट इतर धक्कादायक घटना; आईच्या समोरच एका २१ वर्षीय तरुणाने घेतली दरीत उडी

धक्कादायक घटना; आईच्या समोरच एका २१ वर्षीय तरुणाने घेतली दरीत उडी

अंबाजोगाई, ३१ ऑक्टोबर २०२२: अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरातील वनविभागाने तयार केलेल्या व्हू पॉईंटवरुन खोल दरीत उडी घेऊन एका २१ वर्षीय तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ वाजता घडलीय. दिनेश नरेश लोमटे राहणार कोष्टी गल्ली अंबाजोगाई असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनेशचे वडील मनोरुग्न होते आणि सतत आजारी असल्यानं त्यांचं तीन वर्षापुर्वी निधन झालं होतं. वडीलांचं निधन झाल्यानंतर बहीणीनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच दरम्यान दिनेशनंही आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

काही दिवसांपासून दिनेशची मानसिक स्थिती बरोबर नसल्यानं आज सकाळी तो घरातून पळत सुटला. त्याला आडवण्याचा प्रयत्न गावातील लोकांनी केला होता. परंतू यांना हुलकावणी देत मुकुंदराज परिसरातील पॉईंटवरुन त्यानं उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version