बेळगाव, १३ ऑक्टोबर २०२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चंदीगड मार्गे बेळगाव येथे पंचवीस बैल घेऊन येणारा कंटनेर बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी कंटनेरसह पन्नास लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
लप्मीचा रोगाचा सर्वत्र प्रादुर्भाव आहे, त्यामुळे जनावरांची ने-आण करण्यास मनाई असताना देखील सिंधुदुर्गहून बेळगावला बेकायदा जनावरे विक्री करणाऱ्या टोळीकडून सातत्याने जनावरांची तस्करीचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्गमधील जंगलात रात्रीच्या वेळीस जाऊन कंटनेरमध्ये जनावरे भरुन हा कंटनेर मध्यरात्री चंदीगड मार्गे बेळगावला रवाना केली जातात.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच बेळगाव-वेंगुर्ला या महामार्गावर पाटणे फाटा या ठिकाणी कंटेनर ची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर चालकने पलायन केले आहे. बेकायदा वाहतूक करुन जनावरे कत्तलखान्याकडे नेत असून त्यांच्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीसांकडे केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर