धक्कादायक घटना; सोलापुरात शीख युवकाचा खून

सोलापुर,०३ ऑक्टोबर २०२२: सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये राहणाऱ्या एका शीख युवकाचा आज सकाळी धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार करुन हा खून करण्यात आला आहे.

रवीसिंग सिसपाल सिंग टाक वय वर्ष बावीस असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना भरवस्ती मध्ये घडली असल्याने तीथे त्या युवकांचे नातेवाईकही उपस्तीत होते. घटना घडल्यानंतर तात्काळ तरुणाला जखमी अवस्तेत सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतांना रवीसिंग याचा मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलिस रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी मारेकरी विरोधात गुन्हा दाखल केला.

मारेकरी हा त्यांच्या वस्तीत राहणारा आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा