धक्कादायक घटना, उसने पैसे देऊन महिलेवर दोन वर्ष अत्याचार

औरंगाबाद, १९ सप्टेंबर२०२२: औरंगाबाद येथील वाळूज परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पासून विभक्त राहत असलेल्या महिलेवर एकाने दोन वर्ष अत्याचार केला आहे. ती महिला एकटी राहत असण्याचा फायदा घेत आरोपीने महिलेला पन्नास हजार रुपये उसने दिले. त्यानंतर सतत दोन वर्ष तिच्यावर आत्याचार केला.

या प्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनवीर तसलीम शेख आसे आरोपीचे नाव आहे. मिळाल्या माहितीनुसार २९ वर्षीय पीडीत महिला पतीपासून विभक्त राहते.

महिला वाळूज एमआयडीसी येथील एका खाजगी कंपनीत काम करत होती. मागील दोन वर्षापासून तनवीरची या पीडीत महिलेशी ओळख झाली होती. त्यावेळी महिलेला पैशाची गरज होती. म्हणून तनवीर कडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. आरोपीने महिलेचा एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.

तुला दिलेले पैसे तु मला परत नको करु पण तु माझ्यासोबत राहा. असं म्हणून आरोपी दोन वर्ष महिलावर आत्याचार करत होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा