कर्नाटकात धक्कादायक प्रकार, वाळू माफियांनी हेड कॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडले

कलबुर्गी, कर्नाटक १६ जून २०२३: कर्नाटकातील कलबुर्गी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ड्युटीवर असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून मारले. जेवरगी तालुक्यातील नारायणपूर जवळ अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न नेलोगी पोलिस ठाण्याच्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने केला असता ही घटना घडली. यात ५१ वर्षीय कॉन्स्टेबल म्हैसूर चौहान यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हेड कॉन्स्टेबलने तपासणीसाठी ट्रॅक्टर थांबविण्याच्या प्रयत्न केला. पण ट्रॅक्टर न थांबवता चालकाने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालून भरधाव वेगाने पुढे नेल्यामुळे कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसानीं ड्रायव्हर सिद्धण्णा याला अटक केली आहे. त्याच्यावर वाळू तस्करी आणि सदोष मनुष्यवंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची कर्नाटक सरकारने गंभीर दखल घेऊन, बेकायदा वाळू उत्खननावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले आहे. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे कर्नाटकचे मंत्री एम सी सुधाकर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा