दांडियात धक्कादायक प्रकार; दोन गटांत तुफान हाणामारी आणि गोळीबार

40

सातारा, ५ ऑक्टोबर २०२२: सातारा शहरात एक धक्कादायक प्रकार घटला आहे. दांडिया खेळत असताना दोन गटांत तुफान वादावादी झाली. यानंतर वाद थेट फायरींग पर्यंत गेला आहे आणि फायरींग करणारे तरुण फसार झाले आहेत.


पोलिसांनी दीलेल्या माहितीनूसार काल रात्री दांडीयाचा कार्यक्रम चालू असताना भरपूर प्रमानात तरुण तरुणी आणि महीला उपस्तीत होत्या. अचानक दोन गटांत वादावादी सूरु झाली. हा वाद पाहून महिला आणि तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मारामारी सूरु झाली होती.


आयोजकांनी मध्यस्ती करुन दोन्ही गटांना पांगवले, परंतू बाहेर जाऊन पुन्हा जोरदार भांडण चालू झाले. काही तरुणांनी ढोणे कॉलणीत हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण परीसरात भीतीचे वातावरण पसरले होते.


शाहूपुर पोलिस तत्काल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांना जिवंत काडतूसं व पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर