धक्कादायक प्रकार, औरंगाबादच्या महापालिकेत कामगार कल्याण विभागात अडीच कोटीचा घोटाळा

औरंगाबाद, २६ ऑक्टोबर२०२२: औरंगाबाद महापालिकेच्या कामगार कल्याण विभागात तब्बल अडीच कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पन्नास रुपये कपात करण्यात येते.

मागील वीस वर्षांमध्ये या रकमेचा तपशील वरीष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलाच नाही. पतसंस्थेवर नेमलेला कर्मचारी हा सर्व हिशोब पाहत आसतो. या अपहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे‌. आजही एकादा कर्मचारी मरण पावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अनेक वेळा चकरा मारायला लागतात.

यानंतर कुटुंबीयांना फक्त वीस हजार रुपये देण्यात येतात. तर दरमाह एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मनपा कर्मचारी कल्याण निधीत जमा होतो. दरवर्षी बारा लाख रुपये जमा होतात. मागील वीस वर्षांत किमान अडीच कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचा दावा कर्मचारी करत आहे.

ही रक्कम नेमकी गेली कुठे, असा प्रश्न औरंगाबाद महापालिकेचे कर्मचारी विचारत आहेत. म्हणून या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा