गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर धक्कादायक, महिला आणि पुरुषाची हत्या करून फेकलं नदीत

धक्कादायक, महिला आणि पुरुषाची हत्या करून फेकलं नदीत

नागपूर, 8 जुलै 2022: शहरालगतच्या बुटीबोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिला आणि पुरुषाची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. या दोघांचेही हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते.

रुई खैरी शिवार जवळील वेणानदी पात्रात या दोघांचेही मृतदेह गुरवारी आढळून आले. सुमारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील हे दोघे असल्याचे सांगितले जात आहे. वेणा नदीजवळील पुलावरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीला एक पुरुष आणि महिलाचा मृतदेह तरंगताना आढळून आले. त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी त्यांना दोरीनी बांधलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना दोन्ही मृतदेह आढळून आले. त्यानंतर ते दोन्ही मृतदेह बाहेर काढले. हे दोन्ही मृतदेह नायलॉन दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. तसेच 15 ते 20 किलो वजनाच्या दगडाला बांधून त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिस आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता लोकांचा तपास करत आहे.

या हत्येमागे नेमके काय कारण आहे?मयत पुरुष आणि महिला कोणत्या परिसरात राहणारे होते याचा शोध घेणे सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version