आपण अनेकदा पाहतो बुटांची ही दुर्गंधी आसपासच्या लोकांना सुद्धा त्रास देते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मान खाली घालावी लागते. पण जर या त्रासापासून सुटका करायची असेल तर काही उपाय करणे गरजेचे आहेत. त्यामुळे आपल्या बुटांना दुर्गंधी येणार नाही.
■ बुटांमध्ये मोठ्या प्रमाणावर न्युज पेपर घालून ठेवावा. थोड्या दिवस तसेच ठेवल्यानंतर न्युज पेपर बुटांमधील आद्रता आणि दुर्गंधी शोषून घेते. तुम्ही न्यूज पेपरवर परफ्युम सुद्धा मारू शकता.
■ लवेंडर ऑइल मध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. कोमट पाण्यात २-३ थेंब लवेंडर ऑइल टाकावे. यात १५-२० मिनीट पाय बुडवून ठेवावे. काही दिवस असे रोज करावे.
■ बूट काढल्यानंतर त्यावर पावडर टाकावी. बूट घालण्याआधी पायांवर पावडर टाकावी.
■ पाय धुताना नेहमी अँटी बॅक्टरीअल साबणाचा वापर करावा. पाय चांगल्या प्रकारे पुसावेत आणि अँटीपरस्पिरेंट टाकावे. व्हिनेगर आणि पाणी मिसळून पाय धुतल्याने सुद्धा बॅक्टरीया मारतात.
■ पायात नेहमी धुतलेले पायमोजे वापरावे. त्यामुळे पायाचा आणि बुटाचा वास कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते.