गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पॅरिसमध्ये गोळीबार; दोन ठार

पॅरिसमध्ये गोळीबार; दोन ठार

पॅरिस, २३ डिसेंबर २०२२ पॅरिस शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी आज अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका ६० वर्षीय व्यक्तीने पॅरिसमधील १० -अरंडिसमेंटच्या गल्लीत अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत दोन व्यक्ती ठार झाल्या आहेत. तर, चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकाडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या वक्तीला पॅरिस पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार घडलेल्या ठिकाणापासून नागरिकांनी दूर रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version