गोल पोस्ट गुन्हा कल्याणमध्ये मटका किंगवर गोळीबार …. जागीच मृत्यू

कल्याणमध्ये मटका किंगवर गोळीबार …. जागीच मृत्यू

कल्याण, १ ऑगस्ट २०२०: कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात नीलम गल्ली शेजारी काल रात्री अज्ञांताकडून गोळीबार झाला. या गोळीबारात मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याचा जागीच मृत्यू झाला. त्याला ४ गोळ्या झाडून त्याच्या मृत्यू केला गेलाय असा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे.

पोलिस घटनस्थळी पोहचताच हमला करणारे फरार झाले त्यानंतर पोलिसांनी जिग्नेश ठक्कर याला फोर्टिस हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र काही क्षणांतच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिग्नेश ठक्करवर कल्याण आणि उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये मटका आणि रम्मी कल्ब चालवत असल्याचे गुन्हे दाखल आहेत क्रिकेट मॅच मध्ये सुट्टा बाजारात त्याचे वर्चस्व होते.

या गोळीबारात कोण कोण सामील होत ? ही घटना कश्यामुळे घडली ? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. त्यामुळे भर रस्त्यात घडलेली घटना पाहून नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version