हडपसर, दि. १९ मे २०२०: हडपसर येथे काल दि १८ मे २०२० रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जुनी म्हाडा कॉलनीतील ओम ट्रेडिंग दुकानात एक जण तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून छापा टाकला व त्यावेळी तेथून विविध कंपनीच्या सिगारेट, गायछाप तंबाखूचा असा २० लाख ४४ हजार चा साठा जप्त केला. देवेंद्र परशुराम गुप्ता, (वय ३०) राहणार जुनी म्हाडा कॉलनी हडपसर असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय टिकोळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शिंदे, अर्जुन दिवेकर, शिवाजी रहीगुंडे, रामचंद्र जाधव, हेमा ढेबे, यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे











































