व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ऍड झालं शॉपिंग बटण, जाणून घ्या काय आहे उपयोग

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर २०२०: व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून एका मागून एक नवीन फिचर्स लॉन्च करत आहे. अशातच व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्या अ‍ॅपवर शॉपिंग बटण जोडत आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, हे वैशिष्ट्य व्यवसायांसाठी फायदेशीर असंल आणि याचा फायदा त्यांना आपली विक्री वाढवण्यासाठी होईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचर अंतर्गत यूजर्सना बिझनेस व्हॉट्सअॅप अकाउंट्स प्रोफाइलच्या जवळ एक शॉपिंगचं बटण दर्शविलं जाईल. हे बटण स्टोअर चिन्हासारखं दिसंल.

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप च्या म्हणण्यानुसार दररोज व्हॉट्सअ‍प बिझनेस खात्यात १७५ मिलियन लोक मेसेज करतात. कंपनीनं असंही म्हटलं आहे की दररोज ४० मिलियन वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर बिझनेस कॅटलॉग पाहतात. व्हॉट्सअॅपच्या मते जगभरातील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी शॉपिंग बटण ॲक्टीव केलं जात आहे. कंपनीनं असंही म्हटलं आहे की, बिजनेस अकाउंट मधील व्हॉइस कॉल बटनाच्या ऐवजी हे शॉपिंग बटन देण्यात येणार आहे. व्हॉईस कॉल बटणासाठी, वापरकर्ते कॉल बटणावर टॅप करुन व्हॉईस आणि व्हिडिओ दरम्यान निवडू शकतात.

या सुविधेचा वापर करण्यासाठी आपण कोणत्याही बिजनेस अकाउंट मध्ये जाऊ शकता. जसं की आपण नुकतेच एखादी सेवा किंवा वस्तू घेण्यासाठी एखाद्या अकाउंट मध्ये मेसेज सेंड केला असेल किंवा रिसिव्ह केला असेल. अशा अकाउंट मध्ये गेल्यावर तुम्हाला शॉपिंग बटणावर टॅप करायचं आहे. या बटनावर टॅप केल्यावर आपण या अकाउंट शी संबंधित उत्पादनं व सेवा खरेदी करण्यास सुरुवात करू शकता.

काही दिवसांपूर्वीच व्हाट्सअपनं व्हाट्सअप पे हे मनी ट्रान्सफर फीचर देखील ऍड केला आहे. या फीचर चा वापर करून आपण ऑनलाईन पैसे व्हाट्सअप च्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकता. यूपीआय तंत्रज्ञानावर आधारित हे पेमेंट सिस्टम आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा