इंदापूर, दि. १२ मे २०२० : शासनाने कोरांना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८५७ मधील तरतूदीनूसार संधारवंटी जाहीर केलेली होती. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होत असल्याने, त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आखण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात दि. १३ मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत टाळेबंदी जाहीर केली होती. सदरची संचारबंदी ही भारत सरकार याचेकडील दि.२ मे रोजीच्या अधिसूचनेनुसार दि. ३० अखेर त्याची मुदत संपत असल्याने इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना इंदापूर शहरातील दुकान व आस्थापना अटी व शर्तीनूसार रोटेशन पध्दतीने सुरु करण्यासाठी व्यापारी संघातर्फे मागणी केली जात असल्याने शहरातील दुकाने व खाजगी आस्थापना सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती.
याच अनुषंगाने सध्या इंदापूर शहरात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याने आणि आढळू नये याची खबरदारी इंदापूर नगरपरिषद आणि आरोग्य विभाग घेत आहे.
त्यामुळे बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी इंदापूर नगरपरिषदेला दि.११ रोजी सांगितले.
यामध्ये सोमवार आणि गुरुवारी ऑटोमोबाईल, स्वीट होम, फोटो स्टुडिओ आदी. मंगळवार आणि शुक्रवारी कापड दुकाने, भांडी, फुटवेअर,सोने दुकाने आणि बुधवारी व शनिवारी स्टेशनरी, झेरॉक्स, प्रिंट, मातीची भांडी दुकाने आदी.
रविवार वगळून दररोज अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहतील. यामध्ये ग्राहकांनी तोंडाला मास्क लावलेला असेल तरच त्याला वस्तू देणे, एकावेळी दुकानात ५ ते १० ग्राहक खरेदी साठी असतील, शक्यतो वय वर्षे ५ च्या आतील आणि ६० वर्षावरील व्यक्तींना प्रवेश देण्याचे टाळावे आदी नियम आणि अटी घालून नगरपरिषदेला परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे इंदापुरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी नागरिकांना नागरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी