नगर महापालिका सभागृहात शॉटसर्किट, बैठकीतून कर्मचारी पळाले

नगर, २ जून २०२३ : जुन्या महापालिकेच्या सभागृहाला आग लागल्यानंतर त्याची अधापि दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यातच आज नव्या महापालिका इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहात आस्थापना विभागाची बैठक सुरू असताना शॉर्टसर्किट झाले. कर्मचारी लगेच बाहेर पळाले, मेन स्वीच बंद करण्यात आला आणि अनर्थ टळला.

आज नव्या इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहात आस्थापना विभागाची बैठक सुरू असतानाच शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पळताना काही महिला कर्मचारी पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ मेन स्वीच बंद केल्यानंतर अपघात टळला. नंतर आस्थापना विभागाची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात झाली.

यानंतर विधूत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किटचे कारण शोधून दुरुस्ती केली. सभागृहातील शॉर्टसर्किटमुळे विधूत विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. महापालिकेत विविध ठिकाणी विधूत विभागाकडून वीजेचे मेन बोर्ड लावण्यात आले आहे. त्यातील काही बोर्ड पिण्याच्या पाण्याचा कूलरजवळ बसवण्यात आलेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यापासून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा