Shraddha Kapoor as Vithabai Narayangaonkar: बायोपिक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात छावा, सॅमबहादुर, भाग मिल्खा भाग यांसारखे असंख्य चित्रपट. साहित्य, चित्रपट, संगीत,कला यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा प्रवास आपण बायोपिक च्या माध्यमातून अनुभवतो. आणि अश्याच एका आपल्या नृत्य कलेने थक्क करणाऱ्या नृत्यांगनेचा संघर्षमय प्रवास आपण बायोपिक च्या माध्यमातून अनुभवणार आहोत.
हा चित्रपट फक्त नृत्याबद्दल नाही. तो एका महिलेच्या धाडसाबद्दल, तिच्या कलेवरील प्रेमाबद्दल आणि पुरुषप्रधान जगात तिने कसे अडथळे तोडले याबद्दल आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित हा जीवनपट असणार आहे. विठाबाई फक्त एक नृत्यांगना नव्हती – ती एक धाडसी आणि कणखर महिला होती. तिने कठीण काळातही वर्षानुवर्षे रंगमंचावर लावणी सादर केली. तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय कहाणी अशी आहे की तिने एका कार्यक्रमादरम्यान स्टेजच्या मागे तिच्या मुलाला जन्म दिला. तिला कोणाचीही मदत मिळाली नाही, तिने दगडाने बाळाची नाळ कापली आणि नंतर तिचा परफॉर्मन्स पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा स्टेजवर गेली.
छावा या हिट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. तर विठाबाईंची भुमिका साकारणार आहे श्रद्धा कपुर.अजय-अतुल यांचे संगीत आणि दमदार कथेमुळे, हा चित्रपट श्रद्धाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. इतिहासातील अशा कणखर महिलेची भूमिका साकारणे सोपे नाही, परंतु चाहत्यांना विश्वास आहे की श्रद्धा या भूमिकेला पूर्ण न्याय देईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर