श्रमिक पत्रकार संघाने तालुक्यातील समाजकारण व राजकारणाला नवी दिशा देण्याचे कार्य करावे – प्रदीप गारटकर

इंदापूर दि. ०२ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचा शुक्रवारी पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी श्रमिक पत्रकार संघाने तालुक्यातील समाजकारण व राजकारणाला नवी दिशा देण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन केले. यावेळी कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अशोक मखरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नुकतीच इंदापूर तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. श्रमिक पत्रकार संघाच्या इंदापूर तालुकाध्यक्ष सुरेश मिसाळ, उपाध्यक्ष तात्यासाहेब घाटे, कार्याध्यक्ष देवा राखुंडे, संघटक शिवाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख विजय शिंदे, सल्लागार  राहुल ढवळे, जावेद मुलाणी, सदस्य समिर सय्यद, सिध्दार्थ मखरे, लक्ष्मण बाबा सांगवे, महेश गडदे आदींचा राष्ट्रवादी कार्यालयामध्ये इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी श्रमिक पत्रकार संघाविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले की, तालुक्यातील सर्व समाजातील सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून होत आहे. आपण ज्या पद्धतीने समाजजागृती करता याचे महत्त्व संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. ही जबाबदारी पेलत असताना आपण प्रबळ इच्छाशक्ती, ज्ञान व अनुभवाच्या जोरावर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम यापुढेही करत राहावे.

यावेळी तालुकाध्यक्ष पदी निवड झालेले पत्रकार सुरेश मिसाळ यांनी, आपण यापुढेही सर्व सामन्यांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे सामान्यांची बाजू मांडत राहू अशी ग्वाही दिली. तर श्रमिक पत्रकार संघासाठी कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी विनंती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केली.

न्युज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा