बारामतीमधील श्री गणेश भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा…

बारामती, ८ डिसेंबर २०२०: आज दि. ८ मंगळवारी शेतकरी भारत बंद मोर्चा ला पाठिंबा देऊन गणेश भाजी मार्केट मधील व्यापारी पाळून पाठींबा देणार असल्याचे निवेदन समस्त गणेश भाजी मार्केट येथील विक्रेत्यांनी तहसीलदारांना दिले आहे.

काल गणेश भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सध्या केंद्र शासनाच्या कृषी विषय कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना यांनी दि. ८ रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश असुन शेतकऱ्याला देशाचा अन्नदाता म्हटले जाते. मात्र, सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर अश्रूधुर व पाण्याचे फवारे सोडण्यात आले. शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन न्याय मिळावा म्हणून शहरातील गणेश भाजी मंडई मधील व्यापारी दि. ८ रोजी शेतकरी भारत बंद मोर्चास पाठिंबा देऊन बंद पाळणार असून उद्या भाजी मंडई बंद असणार आहे.

तरी कृषी विषय कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांचा हिताचा कायदा अंमलात आणावा अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे. यावेळी चिऊशेठ जंजिरे, गणेश कदम, बबलू बागवान, ज्ञानेश्वर गवळी, काय्युम बागवान, यासिन बागवान, बाळासाहेब झगडे, सनी अहिवळे, अझहर शेख, जावेद बागवान उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा