श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी राहणार बंद

आंबेगाव : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरलने जगभरात हाहाकार माजवला असून भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुणे येथेहीे काही कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून आंबेगाव तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर हे मंदिर पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग आंबेगाव तालुक्यात असून भीमाशंकर देवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक भक्त येत असतात यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कोरोनाचा संसर्ग होऊ नये या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योर्तिलींगाचे दर्शन दि १७ मार्च रोजी दुपार पासुन पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असल्याने त्याचा फैलाव पसरू नये, दिवसेंदिवस तो कमी होण्याऐवजी त्याचा संसर्ग वाढत आहे. यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मंदिर बंद करण्याअगोदर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दक्षता म्हणून प्रत्येक भाविकाला मंदिरात आल्याबरोबर सॅनिटायझर लावले जात होते. कर्मचा-यांना मास्क देण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा