पैठण, छत्रपती संभाजीनगर २८ जून २०२४ : सव्वा चारशे वर्षांची धार्मीक परंपरा असलेला पैठण येथील शांती ब्रम्ह श्री.संत एकनाथ महाराज पायी पालखी सोहळा शुक्रवारी सुर्यास्त समयी पालखीप्रमुख ह.भ.प.रघूनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाला. यात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अठरापगड जाती, बाराबलुतेदार सह सर्वधर्मीय साधुसंत, हजारो वारकरी लहान मोठ्या दिंड्यांही भानुदास एकनाथांचा नामघोष व हरिनामाच्या गजरात दिंडीत सहभागी झाले आहेत.
या पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहरध्यक्ष जितु परदेशी, नगरसेवक बजरंग लिबोंरे, फाझल टेकडी, अजित पगारे, ईश्वर दगडे, सोमनाथ परळकर, माजी नगराध्यक्ष दत्ताञे गोर्डे, सुरज लोळगे यांच्यासह पैठणकर भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने भानुदास एकनाथांचा गजर करीत निरोप दिला. आजच्या प्रस्थान दिनी दुपारी गावातील नाथ मंदिर ते बाहेरच्या नाथ मंदिरापर्यंत नाथांच्या पवित्र पादुकांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
पालखी ओटा, गागाभट्ट चौक, दोन्ही नाथ मंदिर व शहर परिसरात पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नियंत्रणात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदा, सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पेरण्या लागवडीचे कामं जवळपास पुर्ण होत आलय. नाथांच्या पालखी सोहळ्यात शेतकरी आणि वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याच चित्र दिसुन येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मनोज परदेशी