श्रीगोंदा तालुक्याने उघडले कोरोनाचे खाते

श्रीगोंदा.२५.मे.२०२०: अहमदनगर जिल्ह्यात कर्जत पाठोपाठ आता कोरोनाने जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील चिखली या गावात प्रवेश केला आहे. या महिलेसोबत तिचा मुलगा व सून यांना नगर येथे विलगीकरण कक्ष पाठवण्यात आले होते. त्यांचा तिन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. ही महिला पतिसोबत ठाणे येथे राहत होती. महिलेच्या पतीचे निधन या कोरोनामुळे ८ मे रोजी झाल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्या घेतल्या होत्या. पण चाचणीचा अहवाल येण्याआगोदर महिला श्रीगोंदातील चिखली या गावी माहेरी आली होती. त्या महिलेची तिसरी चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे ठाणे महानगरपालिकेने तीचा कोरोना तपासणी अहवाल पाठवला आहे. अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे समजताच प्रशासन तातडीने कामला लागले आहे.

या महिलेसह तिचा मुलगा व सून यांना अहमदनगर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या तिन्ही चाचण्या घेतल्यावर असे निदर्शनास आले आहे कि, ते दोघे ही निगेटिव्ह आहेत. चिखली गावातील कोणीही नागरिक या परिवाराच्या संपर्क अलेले नाही ही गावातील लोकांसाठी समाधानची बाब आहे.

तहसीलदार महेन्द्र महाजन आणि आरोग्य अधिकारी डाॅ.नितीन खामकर यांनी या बाबत संपुर्ण माहिती घेतली आहे. ग्रामपंचायतीस औषध फवारणी करण्यास सांगितले आहे. श्रीगोंदाचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी चिखली ग्रामस्थांना सावध राहण्याची सुचना दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा