श्रीरामपुर, दि. २६ एप्रिल २०२० : श्रीरामपूर मध्ये कोरोनोमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शहरात देखील पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सर्व रस्ते बंद केले आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. श्रीरामपुर शहर पोलिस निरिक्षक श्रीहरि बहिरट हेही श्रीरामपुर शहराला कोरोनोपासुन दुर ठेवण्यासाठी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यां समवेत दिवसरात्र मेहनत घेत आहेत. शहरात महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावरवर बंदोबस्तासाठी हजर आहेत. टिळक नगर पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी भर उन्हात आपले कर्तव्य बजवताना दिसुन येत आहेत.
येथे येणारे जाणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे. तसेच परराज्यातील वाहने देखिल पूर्ण तपासूनच पुढे सोडली जात आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत तर अनेकांना पोलिसांचा महाप्रसाद देखिल मिळत आहे.
श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्रीहरि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दुधाडे, पोलिस नाईक दिघे, पोलिस कॉन्स्टेबल कारखिले, होमगार्ड वाणी बनकर हे टिळकनगर चौकीला भर उन्हात कर्तव्य बजवत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: दत्तात्रय खेमनर