बांगलादेशचा भारतावर ६ धावांनी विजय, शुभमन गिलचे शतक व्यर्थ

कोलंबो, १६ सप्टेंबर २०२३ : सलामीवीर शुभमन गिलचे पाचवे एकदिवसीय शतक (१२१ धावा) असूनही, शुक्रवारी येथे आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सुपर फोर सामन्यात भारताचा बांगलादेशकडून सहा धावांनी पराभव झाला. बांगलादेशने आपला फिरकीपटू कर्णधार शकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला विजयासाठी २६६ धावांचे लक्ष्य दिले. तथापि, या सामन्याच्या निकालाने दोन्ही संघांना काही फरक पडणार नाही, कारण रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी भारत आधीच पात्र ठरला आहे ज्यात त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

बांगलादेश आधीच आशिया कपमधून बाहेर पडला आहे. म्हणूनच भारताने तिलक वर्माला वनडे पदार्पण करवताना आपल्या पहिल्या पसंतीच्या पाच खेळाडूंना म्हणजेच विराट कोहली, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती दिली. त्यामुळे मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.

गिलने कठीण परिस्थितीत संस्मरणीय खेळी खेळली. मात्र, एका टोकाला विकेट पडत होत्या. गिलने बांगलादेशच्या फिरकी आक्रमणाविरुद्ध सावध खेळ केला आणि ४४ व्या षटकापर्यंत जबाबदारी घेतली. त्याच्या १३३ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि पाच षटकार होते. अक्षर पटेलने (३४ चेंडूत ४२ धावा) अखेर काही शानदार फटके मारत भारताला विजयाच्या शर्यतीत आणले. मात्र तो भारताला पराभवापासून वाचवू शकला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा