बॉलिवूडचा “धोनी” सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई, दि.१४ जून २०२०: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने आपले जीवन संपवले. अगदी कमी कालावधीत त्याने आपल्या कामातून शिखर गाठले होते.

त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये आलेल्या ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला होता.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत असून त्याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सुशांतने ‘ शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘ एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’   ‘पी के’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा