माथेरान, ४ नोव्हेंबर २०२० : मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्रात आजपासून अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू होत आहे.
सकाळी साडे नऊ आणि दुपारी ४ अशा दोन वेळात माथेरानहून शटल निघेल, तर अमन लॉजहून सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी आणि दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी शटल सेवा असेल, असे मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































