टेरर फंडिंग प्रकरणात SIA ची धडक कारवाई, श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी छापे

श्रीनगर, १० नोव्हेंबर २०२३ : जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने (एसआयए) शुक्रवारी दहशतवादी फंडिंग प्रकरणी खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण आरोपींनी गुन्हेगारी कृत्यांमधून बेकायदेशीर निधी गोळा करणे, जमा करणे आणि मनी लॉन्ड्रिंग करणे यासंबंधी आहे.

गुन्हेगारी कृत्यांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी केला गेला, ज्यात कदाचित फुटीरतावाद आणि दहशतवाद यांचा समावेश आहे. असे तपासातून समोर येत आहे. याआधी बुधवारीही एसआयएने जम्मू-काश्मीरमधील जम्मू आणि सांबा जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून म्यानमारमधून आलेल्या एका रोहिंग्या मुस्लिमाला ताब्यात घेतले होते.

गेल्या ऑक्टोबरमध्येही टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर एनआयएने एकूण १८ ठिकाणी छापे टाकले होते. ज्यामध्ये राजौरी, पुंछ, जम्मू, श्रीनगर, बांदीपोरा, शोपियान, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यांचा समावेश होता. यावेळी राजौरी येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा