इतिहासात पहिल्यांदाच सिद्धिविनायक मंदिर बंद

सिध्दटेक, दि. ८ मे २०२०: अष्टविनायक पैकी तिसरा गणपती अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिध्दटेक या ठिकाणी स्थित एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर होय. एखादी गोष्ट बोलल्या नंतर ती सिद्धिस नेणारे म्हणून सिद्धिविनायक हे पंचक्रोशीतच प्रसिद्ध आहे.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून हे मंदिर भाविकभक्ता साठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की इतिहासात पहिल्यांदाच सिद्धिविनायक मंदिर बंद करण्याची वेळ कोरोना या रोगा मुळे आलेली आहे.

मंदिर परिसरात पर्यटन येत असल्याने स्थानिक लोकांचे पोटाचे खळगी भरवण्याची चिंता दूर होत असे पण ताळेबंद मुळे सिध्दटेक मंदिर परिसरात कोणी ही येत नसल्यामुळे सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे बंद आहेत.

जोपर्यंत परिस्थिती पुर्ववत येत नाही तोपर्यंत स्थानिक नागरिकांना संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. नागरिकांनी सिद्धिविनायक कडे प्रार्थना करून लवकरात लवकर हा कोरोना रोग हिंदुस्थान मधुन जावा अशी इच्छा व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा