गोल पोस्ट आरोग्य सिध्दटेक येथील तो संशयित रुग्ण निघाला कोरोना पॉझिटीव्ह

सिध्दटेक येथील तो संशयित रुग्ण निघाला कोरोना पॉझिटीव्ह

कर्जत, दि. २४ मे २०२०: कर्जत तालुक्यात कोरोनाचा दुसरा रूग्ण सापडलेला आहे. पहिला रूग्ण हा राशिन या ठिकाणी सापडला होता आणि कर्जत तालुक्यात कोरोनाचे खाते उघडले गेले होते. दुसरा रूग्ण हा सिध्दटेक येथील वडारवस्ती या वस्ती मधील आहे.

सविस्तर वृत्त असे, सिध्दटेक येथे रूग्ण आल्या नंतर झेडपी शाळेत ठेवण्यात आले होते. काही वेळाने सदर व्यक्तीस सर्दी खोकला आणि थोडा ताप असल्याने त्या व्यक्तीला शुक्रवार रोजी रात्री उशिराने अहमदनगर या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नंतर रविवार सकाळी तपासणी अहवालात त्या रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर तृतीयपंथी व्यक्तीचे वय साठ वर्षे असून रिझल्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती आरोग्य सेवक गुंळवे यांनी दिली. यामुळे सिध्दटेक आणि परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version