पंजाब: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी ९ नोव्हेंबर रोजी करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आमंत्रण स्वीकारले आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार सिद्धू यांनी पाक पंतप्रधानांना उद्घाटनासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. “करतारपूर कॉरिडोरच्या ऐतिहासिक उद्घाटनासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभारी आहोत,” असे ते म्हणाले.
सिद्धू म्हणाले की कर्तारपूर हे जगभरातील सिख समुदायासाठी एक मोठे श्रद्धास्थान आहे.