पुणे: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्ताने हिंदु गर्जना प्रतिष्ठान च्या साने गुरुजी शाखे ने सीएए समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आले आहे.
• नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ नवा कायदा नसून तर तो नागरिकत्व कायदा १९९५ चा सुधारित कायदा आहे.
• पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातील हिंदु, जेन, बौध्द, शिख, पारशी अथवा ख्रिश्चन समुदायातिल जे लोक धार्मिक छळामुळे ३१ डीसें २०१४ पुर्वी भारतात आले आणि देशात रहात आहेत, त्यानी कायद्यातील सुधारणे मुळे नागरिकत्व मिळेल.
• हा सुधारणा कायदा मुस्लिम लोकांचा विरोधात असल्याचा प्रचार चुकीचा आहे.
•भारतात राहणारया पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशच्या अल्पसंख्यांकानी आता नागरिकत्व अर्ज केला तर यापूर्वी बेकायदा राहिले म्हणून कारवाई होणार नाही.
• शिया, अहमदिया आणि हाजरा हे मुस्लिम वांशिक गट आहेत. मुस्लिम धर्मीय असल्यामूळे पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमधे अल्पसंख्यांक नाहित. त्यामूळे त्यांचा या कायद्यात समावेश नाही.
या सारखे मुद्दे नागरिकांना समजुन सांगत आज स.प. महाविद्यालय चौक मधे स्वाक्षरी मोहीम सुरु आहे.
यावेळी धिरज घाटे-हिंदु गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश जावीर – हिंदु गर्जना प्रतिष्ठान सानेगुरजी नगर शाखा , अमर आवळे, अजिंक्य निवदेकर -कार्याध्यक्ष आदेश कांबळे , मंदार जोगदंड, शुभम अडागळे, अभिजीत घडशी (सरचिटणीस व कार्यकर्ते) ह्या वेळी उपस्थित होते.