सिल्लोड नगरपरिषदचे सीईओ सत्तारांचे शिपाई, अंबादास दानवे यांचा आरोप

4

औरंगाबाद १७ जून २०२३: कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. नियम व अटी डावलून मर्जीतील दोन कंपन्यांच्या घशात तब्बल १५० कोटी रुपयांचे कंत्राट घालण्यात आल्याचा आरोप नुकताच त्यांच्यावर झाला होता.

औरंगाबाद शहरातील ‘चिमणा राजा’ जागा ताब्यात घेण्यावरून, आता परत सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेची चिमणा राजा जागेची केस खंडपीठांमध्ये सुरू असताना, त्यावरील अतिक्रमण काढत सत्तार यांनी ती ताब्यात घेतली. यावरून ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली.

सत्तार यांनी नगरपालिकेचा वापर करून सिल्लोडमधल्या प्रचंड जागा ताब्यात घेतल्या आहेत. त्यावर नगरपरिषदेचे सीईओ हे अब्दुल सत्तार यांच्याकडे शिपायाचे काम करतात, अशी टीका दानवेंनी केली. चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठीच सत्तार यांचे अनेक खटाटोप सुरू असुन आयुक्त यांनी कायद्यात राहून काम करावे, असा टोला देखील दानवे यांनी लगावला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा