सिल्लोड तालुका वकील संघातर्फे राहुरी येथील घटनेबद्दल जाहीर निषेध

4

सिल्लोड, ३० जानेवारी २०२४ : सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा लेखणी बंद करून जाहीर निषेध नोंदविला आहे. त्या अनुषंगाने आज वकील संघाचा दालनामध्ये अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील व्यवसायाने वकील असलेल्या ॲड. आढाव दांपत्याचा प्रचंड छळ करून निर्गुण खून करणाऱ्या आरोपी आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या मूळ गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे, हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे या आशयाने ठराव पारित करण्यात आला. यावेळी तालुका वकील संघाच्या वतीने अधिवक्ता सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. सदर ठरावाची प्रत आणि निवेदन तहसीलदार सिल्लोड यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना देण्यात आले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक तायडे आदी वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा