वॉशिंग्टन, दि. २९ मे २०२०: भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केले होती. परंतु भारताने हा प्रस्ताव नाकारला होता व यावर अमेरिकेला सांगितले होते की, भारत आणि चीन यांच्यातील हा सीमावाद आंतरिक वादा आहे. दोन्ही देश यावरती चर्चा करत आहेत व हा मुद्दा शांततेने मिटवला जाईल.
यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की भारत आणि चीन यांच्यातील सुरू असलेल्या सीमा विवादावरून नरेंद्र मोदी यांचा मूड ठीक नाही. माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले आहे व त्या वेळेस मला असे जाणवले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत आणि चीन हे जगातले सर्वात मोठे लोकसंख्या असलेले देश आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या १.४ अब्ज च्या घरामध्ये आहे, तसेच दोन्ही देशांचे सैन्यदेखील आफाट आहे. सध्या या दोन्ही देशांमध्ये सीमेवरून विवाद चालू आहेत. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्याशी मी बोललो आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो, परंतु सध्या चीनशी असलेल्या वादाबद्दल ते चांगल्या मनस्थितीत नाहीत.’
गुरुवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की भारत आणि चीनमधील हा एक मोठा वाद होत आहे. ‘मला भारताचे पंतप्रधान खूप आवडतात. ते एक अतिशय सभ्य मनुष्य आहे.’ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याच्या प्रश्नावर अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, जर मला संवाद किंवा मध्यस्थी करण्यात मदत होईल असे त्यांना वाटत असेल तर मी नक्कीच तसे करीन. तथापि, ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या सूचना भारताने यापूर्वीच फेटाळल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी