रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा

रायगड, दि.६ जून २०२०: छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर साजरा करण्यात आला. मात्र , करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने, या ठिकाणी थोड्याच लोकांची उपस्थिती होती.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते.

सोहळ्याची सुरवात दुपारी गडपुजनाने झाली. यानंतर शिरकाई देवी पूजन करण्यात आले. त्या अगोदर सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली होती. पहाटेच्या वेळी नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राजसदरेवर महाराजांना मानवंदना दिली गेली. सकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.  नंतर शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा