इंदापूर, दि.१२ सप्टेंबर २०२० : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. सध्या इंदापूर शहरामध्ये लॉकडाउन असून या काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने इंदापूर तहसील, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग होण्यासाठी संपूर्ण शहरभर धारावी पॅटर्नप्रमाणे ५५००कुटुंबांपर्यंत जाऊन एकाच वेळी विविध विभागातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या सहकार्याने कोरोना सर्वेक्षण यंत्रणा इंदापुरात राबविली. या सर्वेक्षणाची पाहणी करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी वरील मत व्यक्त केले.
तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक काल घेण्यात आली होती. या नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे यासाठी १०६ टीम तयार करण्यात आल्या. या टीम मार्फत नागरिकांच्या आरोग्य संदर्भातील सर्वेक्षण केले आहे. टीम मधील कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस असे २३० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सीमीटर, थर्मामीटर गण, पल्समीटरद्वारे, कोरोना लक्षणाचे सर्वेक्षण करून कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग केले आहे. ट्रेसिंग झालेल्या संशयित रुग्णांची आय कॉलेज येथील विलगीकरण कक्षामध्ये रॅपिड ॲन्टीजीन टेस्ट करण्यात येत आहे.
अंकिता शहा म्हणाल्या की,’ कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आणि इंदापूर नगरपरिषदेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. घर टू घर जाऊन हे कर्मचारी कोरोना संदर्भातील सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणाचे सर्वत्र कौतुक होत असून या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहर कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.’
न्यूज अन कट प्रतिनिधी-निखिल कणसे