गोल पोस्ट गुन्हा गायक हनी सिंग अडचणीत, पत्नी शालिनीने केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

गायक हनी सिंग अडचणीत, पत्नी शालिनीने केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२१: बॉलिवूड गायक आणि अभिनेता यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. खरं तर, हनी सिंगच्या पत्नीने ‘द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट’ अंतर्गत याचिका दाखल केलीय. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलीय.

ही याचिका तीज हजारी न्यायालयाच्या दंडाधिकारी तानिया सिंग यांच्यासमोर सादर करण्यात आली. शालिनी तलवारच्या वतीने वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका ठेवली. न्यायालयाने हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी केली आहे, ज्यात सिंगरला २८ ऑगस्टपूर्वी उत्तर दाखल करण्यासाठी लिहिले आहे. हनी सिंगवर दोघांची संयुक्त मालमत्ता विकण्यावर आणि स्त्रीधनशी छेडछाड न करण्याबद्दल बंदी घालण्यात आलीय. शालिनी तलवार यांच्या बाजूने आदेश पारित करण्यात आला आहे.

पत्नी शालिनीने केले गंभीर आरोप

हनी सिंगच्या पत्नीने सिंगरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शालिनीने गायकाच्या आई -वडिलांसह हनी सिंगवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा आरोप केलाय. शालिनीने कोर्टाला सांगितलं की, तिचे स्त्रीधन तिला परत करावे आणि तिच्या आणि हनी सिंगच्या नावावर असलेली मालमत्ता विकण्यास बंदी घालण्यात यावी.

हनी सिंह आणि शनीली तलवार यांनी २० वर्षांच्या मैत्री आणि प्रेमानंतर २०११ मध्ये लग्न केलं. शीख रितीरिवाजानुसार दोघांनी दिल्लीच्या फार्महाऊसमध्ये लग्न केलं. बाहेरच्या लोकांना या लग्नाची कोणतीही बातमी मिळाली नसली. या दरम्यान, हनी सिंगचं नाव ‘फियर फॅक्टर – खतरों के खिलाडी ५’ स्पर्धक डायना उप्पल याच्याशीही जोडलं गेलं, पण हनी आणि शालिनीचे नाते बदलले नाही. यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि हनीचे डायनाशी असलेलं नातं संपुष्टात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version