पुणे, दि. ६ जुलै २०२० : येथे आज दि.६ जुलै २०२० कोरोनाच्या लढाईत आपल्या प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, या भावनेतून गायिका मनीषा निश्चल यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान सहाय्यता निधी “पीएम केअर फंड” आणि मुख्यमंत्री सहायता निधीला प्रत्येकी ११ हजार या प्रमाणे २२ हजार रुपयांची मदत दिली आहे.
आपल्या बहारदार आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मनीषा निश्चल यांचे गाण्यांचे कार्यक्रम लॉकडाऊनमुळे बंद आहेत. परंतू फेसबुक, युट्युबसह, सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रोत्यांना कोरोनापासून दूर राहण्यास काय काळजी घ्यावी याबाबत जागृती करत असतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत त्यांनी कोरोनाच्या या लढ्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत मनीषा निश्चल म्हणाल्या, कोरोनामुळे आपण सगळे घरात आहोत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशावेळी त्यांना मदत करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. माझा खारीचा वाटा म्हणून या दोन्ही सहायता निधीला मदत दिली आहे. व लॉकडाऊननंतर गायक, वाद्यवृंद, संगीतकार यांना बळ देण्यासाठी श्रोत्यांनी तिकिटे काढून कार्यक्रम पाहायला हवेत, व माझ्या या योगदानाचे अनुकरण एका व्यक्तीनेही केले तरी माझा प्रयत्न यशस्वी झाल्याचे समाधान लाभेल. असे बोलताना त्यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे