पुणे, १६ ऑगस्ट २०२३ : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामान्य नागरिकांनपासून सेलिब्रिटींनी देखील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल झाले. एवढेच नाही तर, सोशल मीडिया युजर्सने त्यांच्या कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा केला. सामान्य नागरिक,सेलिब्रिटी,सोशल मीडिया यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असताना एका प्रसिद्ध गायिकेवर भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र या गायिकेची चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर, सोशल मीडियावर व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे.
ज्या गायिकेवर तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या गायिकेचे नाव उमा शांती असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण पुणे येथील आहे. १४ ऑगस्ट रोजी मुंढवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उमा शांती म्युझिक बँडसोबत परफॉर्म करत होती. तेव्हा उमा शांती हिने वादग्रस्त कृत्य केले. व्हिडीओमध्ये गायिका आपल्या दोन्हीं हातात तिरंगा फडकवत परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला. गायिका तिच्या या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
राष्ट्रधवजाचा अपमान केल्याप्रकरणी उमा शांती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर दोघांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सोशल मीडीयावर संबंधीत व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. परंतु आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर