साहेब, सुट्टी द्या नाहीतर बायको पळून जाईल…

भागलपूर : पोलीस प्रशासनात काम करताना अनेकदा त्यांना सणांना सुट्टी मिळत नाही. त्यांना चोवीस तास काम करावे लागते. तसेच जेव्हा सर्वांना सुट्टी असते.तेव्हा देखील यांना काम करावे लागते. त्यामुळे अनेकदा पोलिसांचा हिरमिड झाल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, कुठल्याही सणाला सुट्टी मिळत नसल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्र लिहून आपली व्यथा वरिष्ठांकडे मांडली आहे.  हे पत्र वाचल्यानंतर पोलिसांना यातून एक वेगळीच गोष्ट समोर आल्याचे त्यांना समजले. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यंदा होळीमुळे पोलीस विभागाकडून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रामध्ये, बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सीटीएस नाथनगर येथील एका प्रशिक्षक पोलीस शिपायाने सीटीएस प्रमुखांकडे हा अर्ज केला आहे. या अर्जात या पोलिसाने आपली वेगळीच कहानी वरिष्ठांकडे मांडली. सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या निवेदन अर्जात लिहिले आहे की, ५ मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर माझ्या पत्नीचा फोन आला होता. ”यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी यायचंय, नाही आलात तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल,” पत्नीचे हे वाक्य ऐकून मी खूप तणावात आलो आहे, असे संबंधित पोलिस शिपायाने आपल्या अर्जात म्हटले आहे. हे वृत्त एका संकेतस्थळाने प्रकाशित केले आहे.

यात विशेष म्हणजे पुढे विनंतीही केली आहे. मला होळीसाठी ५ दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलीस शिपायाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा निवेदन अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या कर्मचाऱ्याला सुट्टी देणार की नाही, हा प्रश्न वरीष्टांसमोर उभा राहिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा