बहिणीला धमकावलं, मारत राहिला आईच्या मृतदेहावर रुम फ्रेशनर… PUBG साठी केला आईचा खून

लखनऊ, 8 जून 2022: लखनऊमध्ये एका अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली, कारण आईने PUBG गेम खेळण्यास नकार दिला होता. मंगळवारी रात्री यमुनापुरम कॉलनीतून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करण्यात आला की, शेजारच्या घरातून उग्र वास येत असून काही गडबड होण्याची शक्यता आहे. रात्री पोलिस जेव्हा या घरी पोहोचतात तेव्हाच घरात एक अल्पवयीन भाऊ-बहीण भेटतात, मात्र आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडल्यावर सगळेच चक्रावून जातात.

खोलीत एका महिलेचा मृतदेह पाहून पोलिसांना धक्का बसला. मृतदेह या दोन मुलांच्या आईचा होता, प्रकरण हत्येचं होतं, पण या हत्येमागची कहाणी अशी आहे की, यामुळं देशातील पालक चिंतेत पडणार आहेत. मोबाईल गेमिंगच्या व्यसनामुळं मुलाने आईचा खून केला. खून झालेला मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच होता.

आई PUBG खेळणे बंद करायची

मोबाईल गेमिंगच्या व्यसनाधीन झालेल्या मुलाला गेम खेळण्यासाठी आईने मनाई केल्यामुळं मुलाने आपल्या आईचा जीव घेतला यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, परंतु लखनौ पोलिसांनी काही तासांत या खून प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आहे आणि त्यांच्या मते, हत्येचा हा सिद्धांत 100% बरोबर आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने पोलिसांना कबूल केले आहे की त्याची आई त्याला मोबाईलवर PUBG गेम खेळण्यापासून रोखत असे.

याचा राग येऊन त्याने रविवारी मध्यरात्री वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने आईच्या डोक्यात गोळी झाडली. आईच्या मृत्यूनंतर त्याने मृतदेह खोलीत बंद केला आणि लहान बहिणीला धमकावून दुसऱ्या खोलीत बंद केलं आणि संपूर्ण दोन दिवस आईच्या मृतदेहासह या घरात कोंडून राहिला.

ही दुर्गंधी शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा उघड झालं रहस्य

पोलीस जेव्हा या घरात शिरले तेव्हा हवेत दुर्गंधी आणि सुगंधाचे मिश्रण होतं. मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने आरोपी मुलाने ते लपवण्यासाठी घरात रूम फ्रेशनर फवारलं. असं असतानाही मृतदेहाची दुर्गंधी शेजाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं.

वडिलांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने हत्या

मुलाचे वडील लष्करात असून बंगालमध्ये तैनात आहेत. या घरात आई आणि दोन्ही मुले एकटेच राहत होते. वडिलांनी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर घरातच ठेवली होती. या रिव्हॉल्व्हरमुळे आपलं घरही उद्ध्वस्त होऊ शकतं, असं त्यांना वाटलं नव्हतं, पण नेमकं हेच घडलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा