हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ पुरंदर मध्ये काँग्रेसच्या वतीनं ठिय्या आंदोलन

पुरंदर, ६ ऑक्टोंबर २०२०: पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काल सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये काँग्रेस कमिटीच्यावतीनं हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात ठीया आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीनं हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी मोदी आणि योगी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला होता.

हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण हे समाजाला काळीमा फासणारी घटना असून पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना विश्‍वासात न घेता प्रकरण दडपण्याच्या हेतूनं केलेला अंत्यविधी, त्याचप्रमाणं राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व पत्रकार बांधव यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक वागणूक देत केलेल्या धक्काबुक्की तसेच पीडितेच्या घराच्या लोकांपर्यंत त्यांना जाण्यापासून रोखणे या गोष्टी अतिशय गंभीर व अन्यायकारक बाब असल्याचं म्हणत काल हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

या घटनेमुळं नागरिकांच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कोणतीही प्रतिक्रीया न देता उलट पक्षी सदर आरोपींची पाठराखण करत असल्याचं दिसून येते आहे. योगी व मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील महिला सुरक्षित नाहीत. आसं
नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप यांनी यावेळी सांगितलं.

केंद्र शासनाच्या नव्या शेती विषयक विधेयकात आधारभूत किमती, सरकारी धान्य खरेदी, घाऊक बाजार, हे शेतीचे मुख्य आधार आहेत ते जपले पाहिजेत. आधारभूत किमतीच्या व्यवस्थेशिवाय शेतकरी जगू शकत नाही. हे सरकारनं लक्षात घ्यावं. केंद्र सरकारनं शेती विषयक केलेल्या नवीन विधेयकाने तसेच केंद्र सरकारनं कामगार विधेयकामध्ये अन्यायकारक दुरुस्त केल्यानं कामगार कोठेही दाद मागू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं ही जगताप म्हणाले.

यावेळी महिला अध्यक्षा सुनीता कोलते, युवक अध्यक्ष सागर मोकाशी, उपाध्यक्ष चंद्रकांत पिलाणे, मार्केट कमिटीचे उपसभापती बापू औचरे, बाळासाहेब पायगुडे, मोहित जाधव, महादेव शेंडकर, अशोक कुंभार, दिलीप जाधव, शिवाजी शेंडकर, पांडुरंग गायकवाड, दत्तात्रय हंबीर, सुरज जगताप, विजय कदम, लक्ष्मण धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा